spot_img
spot_img

बुलढाण्यात नवे बॉस! डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची एंट्री; प्रशासनाला मिळणार नवी गती 

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा प्रशासनात आज मोठा बदल पाहायला मिळाला असून, डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी बुलढाणा जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. माजी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून देवरे यांचे स्वागत केले आणि प्रशासकीय सूत्रे त्यांच्या हाती सुपूर्द केली.

पदभार स्वीकृतीच्या या सोहळ्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी, विविध विभागांचे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आगमनामुळे प्रशासनात उत्सुकता आणि अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे.

पदभार स्वीकारताच डॉ. देवरे यांनी कामाला वेग देत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. जिल्ह्याच्या सद्यस्थितीचा सखोल आढावा घेत, प्रलंबित प्रश्न, विकासकामे आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

“शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि प्रशासन अधिक गतिमान करणे हेच माझे प्राधान्य असेल,” असे ठामपणे सांगत त्यांनी कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!