spot_img
spot_img

दारूच्या नशेत ग्रामसेवक? बोरे यांचा गंभीर आरोप, पुरावेही तयार! घरकुलासाठी १० हजारांची मागणी? ऑडिओ क्लिपचा दावा, प्रकरण तापले!

मेहकर (हॅलो बुलढाणा) उकळी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारांमुळे संतप्त झालेल्या अमोल बोरे यांनी पंचायत समितीसमोर अर्धनग्न आंदोलन छेडत प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे. ग्रामपंचायतीतील भ्रष्ट कारभार, दुर्लक्ष आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे होत असलेली बेफिकिरी याविरोधात बोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली.

ग्रामसेवक दारूच्या नशेत कार्यालयात येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, गरीब नागरिकांकडून घरकुल योजनेसाठी तब्बल १० हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक दावा देखील त्यांनी केला आहे. यासंदर्भात ऑडिओ क्लिप असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाला पुरावे सादर करण्याची तयारी दर्शवली आहे.

या आंदोलनाला स्थानिक ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळत असून, परिसरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, संबंधित ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई न झाल्यास सहपरिवार आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.या प्रकरणामुळे मेहकर तालुक्यात खळबळ उडाली असून, प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!