दुसरबीड (हॅलो बुलढाणा/ प्रदीप साळवे) “गाव अजूनही विकासाच्या प्रतीक्षेतच का?” असा थेट आणि आक्रमक सवाल उपस्थित करत सिदखेड राजा तालुका भाजप पदाधिकाऱ्यांनी ग्रामसचिवालयात जोरदार उपस्थिती लावली. दिनांक २५ रोजी ग्रामसचिवालय, दुसरबीड येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा सप्रेम भेट देत “आता तरी विकास कामांना गती द्या” असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
या वेळी तालुका उपाध्यक्ष सुरेश बुलकडे, अल्पसंख्यक जिल्हा महामंत्री शेख जावेद, एससी सेलचे जिल्हा महामंत्री नानासाहेब तौर, तसेच गजानन सोनवणे आणि शेख फय्युम यांनी प्रशासनाला जाब विचारला. “केंद्र सरकार योजना देते, पण स्थानिक पातळीवर अंमलबजावणी का होत नाही?” असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला.
कार्यक्रमावेळी ग्रामविकास अधिकारी अशोक बनकर, ग्रामप्रशासक, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, “प्रतिमा देऊन नव्हे तर काम करून दाखवा” अशी ग्रामस्थांमध्येही जोरदार चर्चा रंगली असून, दुसरबीडच्या विकासाचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.










