spot_img
spot_img

💥💥BREAKING “जिजाऊंच्या नगरीत जिजाऊंच्याच लेकींचा अपमान! आशा सेविकांचा संताप अनावर” प्रशिक्षणाच्या नावाखाली अवमान; 167 महिलांना उपाशी ठेवले चक्कर येऊन हात फ्रॅक्चर प्रशासनाची संवेदनशीलता शून्य!

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा) आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या ढिसाळ आणि बेजबाबदार नियोजनामुळे आशा सेविकांवरच आपत्ती ओढवल्याचा धक्कादायक प्रकार 16 मार्च रोजी समोर आला. प्रशिक्षणासाठी बोलावूनही मूलभूत सोयींचा अभाव, जेवण न देणे आणि परिणामी एका आशा सेविकेचा हात मोडण्याची गंभीर घटना घडल्याने प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, आशा सेविकांना सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पत्रात चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय असल्याचे नमूद होते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णतः उलट दिसून आली. दुपारच्या जेवणाच्या वेळी प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांना जेवण वाढण्यात आले, मात्र तब्बल 167 आशा सेविका उपाशीच बसून राहिल्या. तासभर प्रतीक्षा करूनही जेवण न मिळाल्याने संताप उसळला.

प्रतिनिधी म्हणून विचारणा केल्यानंतर फक्त 100 जणांसाठीच जेवणाचे नियोजन असल्याची माहिती समोर आली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त आशा सेविका तहसील कार्यालयाकडे निघाल्या. यावेळी उपाशीपोटी चालत असताना वर्दडी येथील आशा सेविका आरती काकडे यांना चक्कर येऊन त्या कोसळल्या. या अपघातात त्यांच्या उजव्या हाताच्या दोन्ही हाडांना फ्रॅक्चर झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले आहे.

जर वेळेवर जेवण दिले असते, तर ही घटना टळली असती, असा संतप्त सूर आशा सेविकांमधून उमटत आहे. जिजाऊंच्या नगरीतच ‘जिजाऊंच्या लेकीं’चा झालेला अपमान प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभा करत आहे.

या घटनेचा निषेध करत संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी आशा संघटनेकडून करण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!