spot_img
spot_img

💥💥BREAKING ‘बिबट्याला वाघ शोधतोय!’ जळगाव जामोदमध्ये थरारक रात्रीचा पाठलाग

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) शहरात काल मध्यरात्री बिबट्याच्या प्रवेशाने भीतीचे सावट पसरले. रात्री साधारण २:२० वाजण्याच्या सुमारास जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांना नगरसेवक पती जहीर यांचा घाबरवून टाकणारा फोन आला “भाऊ, तुमच्या घराजवळ बाग (बिबट्या) घुसला आहे!”

क्षणाचाही विलंब न करता गजानन वाघ तात्काळ घराबाहेर पडले. त्याचवेळी समीर आर्यन, सोहेब, तंजीर व त्यांच्या मित्रपरिवाराने जीवाची पर्वा न करता अंधारातच बिबट्याचा शोध सुरू केला. रात्री ३ वाजताच पोलीस प्रशासन आणि वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली. तसेच सोशल मीडियावरील सर्व ग्रुप्सवर सतर्कतेचे संदेश पाठवून नागरिकांना सावध करण्यात आले.

एकीकडे शहर झोपेत असताना दुसरीकडे हा थरारक शोधमोहीम सुरू होती. परिस्थिती अशी निर्माण झाली होती की “बिबट्याला वाघ शोधतोय” अशीच चर्चा परिसरात रंगली. मात्र, चतुर बिबट्याने सर्वांना चकवा देत अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

बिबट्याच्या या अचानक हालचालीमुळे जळगाव जामोद शहरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये दहशत आहे. वनविभागाची संपूर्ण टीम घटनास्थळी दाखल झाली असून बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे, रात्री बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, गजानन वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या सतर्कतेमुळेच वेळेत प्रशासनाला माहिती मिळून मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!