चिखली (हॅलो बुलडाणा/सय्यद साहिल) मेहकर तालुक्यातील फुदनापूर परिसरात मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला असून दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश भुजंगराव चिंचोले (वय 32, रा. सारशीव ता. मेहकर) हे दुचाकीवरून जात असताना फुदनापूर येथे दुपारी सुमारे 3 वाजेच्या सुमारास दुसऱ्या दुचाकीशी त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की सतीश चिंचोले गंभीर जखमी झाले.
स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी चिखली येथील महेंद्रे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.












