spot_img
spot_img

💥EXCLUSIVE – आमदाराच्या चालकाचा संशयास्पद मृत्यू? – पत्नीची सीआयडी चौकशीची मागणी! – सोशल मीडियावर थेट मुख्यमंत्र्यांना सवाल!

जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) भाजप आमदार डॉ. संजय कुटे यांच्या वाहनावर एकेकाळी चालक असलेल्या पंकज देशमुख यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप होत असून त्यांच्या पत्नीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.

चालक पंकज देशमुख यांचा मृतदेह ३ मे रोजी बहऱ्हाणपूर रस्त्यावरील एका शेतात झाडाला रुमालाने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मात्र, त्यांच्या हात, पाय आणि मानेवर गंभीर जखमा दिसून आल्याने ही आत्महत्या नसून थेट हत्या असल्याचा आरोप त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी केला आहे.
सुनीता देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सोशल मीडियावर भावनिक आणि खळबळजनक पोस्ट लिहीत थेट सवाल केला आहे “पहलगाममध्ये भगिनींचं सिंदूर पुसलं गेलं म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ चालवलं गेलं, पण इथे माझं सिंदूर गावातच पुसलं गेलं… त्याचं काय?” त्यांच्या या तीव्र शब्दांनी सोशल मीडियावर खळबळ उडाली असून, राज्याच्या राजकारणातही या प्रकरणाने तापते वळण घेतले आहे.

देशमुख यांनी बुलढाणा पोलिस अधीक्षक आणि अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे थेट तक्रार दाखल केली असून, स्थानिक पोलिस तपासावर विश्वास नसल्याचे स्पष्ट करत सीआयडी मार्फत सखोल चौकशीची मागणी केली आहे. “पतीच्या मृत्यूमागे मोठे षड्यंत्र आहे, आणि ते उघड होणे आवश्यक आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पंकज देशमुख हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होते आणि गेली दोन दशके आमदार कुटे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून कार्यरत होते. अशा व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू हा केवळ एक अपघात किंवा आत्महत्या म्हणून स्वीकारता येणार नाही, असे पत्नीचे म्हणणे आहे.या प्रकरणातील चौकशीची गती संथ का आहे? पोलिस तपासात दिरंगाई का केली जात आहे? आणि मृत्यूस जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरे मागणारी पिडीताची मागणी आता अधिक तीव्र होत आहे. ‘हॅलो बुलडाणा’ने ही खळबळजनक बाब सर्वप्रथम प्रकाशझोतात आणली असून, या प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी होईपर्यंत आवाज बुलंद केला जाणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!