डोणगाव (हॅलो बुलडाणा) नियती कधी डाव साधेल याचा नेम नाही.एका 11वर्षीय मुलाला भूक लागल्यामुळे त्याने ताट वाढून घेतले आणि त्याला सर्पदंश झाल्याने त्याची प्राणज्योत मालवली.ही हृदयदावक घटना मेहकर तालुक्यातील गोहोगाव येथे घडली. इशांत प्रवीण तांगडे रा. परतापुर असे मृतक मुलाचे नाव आहे.
प्रवीण शिवाजी तांगडे मालवाहू वाहन चालवितात. त्यांची पत्नी शेती करते.त्यांना दोन मुले असून धाकटा मुलगा इशांत घरी एकटाच होता. भूक लागल्यामुळे ईशांतने जेवणासाठी ताट वाढून घेतले आणि तेवढ्यात त्याच्या पायाच्या अंगठ्याला सापाने अचानक दंश केला.दरम्यान त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याला मेहकर रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. नातेवाईक रुग्णालयात घेऊन जात असताना त्याची प्राणज्योत मालविल्याने गावावर शोककळा पसरली आहे.