बुलढाणा (हॅलो बुलडाणा) स्वाभिमानी क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या ‘लोकरथ’ नामक वाहनाला एका ट्रकने मागून धडक दिल्याची घटना वाशी- पारगाव च्या टोल नाक्याजवळ मध्यरात्री घडली असून, नशीब बलवत्तर होते म्हणून तूपकर सुदैवाने बचावले मात्र वाहनातील दोघांना दुखापत झाली आहे.विशेष म्हणजे या घटनेमागे विरोधकांनी काही घाट रचल्याचा संशय स्वतः तुपकर यांनी व्यक्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, 17 एप्रिल च्या रात्री अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील सभा झाल्यानंतर तूपकर इनोव्हा या लोकरथाने लातूर येथून जालन्याच्या दिशेने निघाले होते.त्यांच्यासोबत स्विय सहाय्यक व एक संघटनेचा पदाधिकारी होता.दरम्यान वाशी तालुक्यातील पारेगाव टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला ट्रकने मागून धडक दिली.झालेल्या अपघातात तुपकर बचावले.मात्र त्यांच्यासोबत असलेलेमित्र गजानन नाईकवाडे, स्विय सहाय्यक कार्तिक सवडतकर यांना दुखापत झाली आहे.याप्रकरणी ट्रक जप्त करण्यात आला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस करीत असून,तुपकर यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.