spot_img
spot_img

💥भयंकर! बापाच्या डोळ्या देखत लेका वर ‘वज्रघात!’ – एक जण जखमी

लोणार (हॅलो बुलडाणा/भागवत आटोळे) गेल्या काही दिवसांपासून वीजाच्या गडगडाटासह वादळी पाऊस कोसळत आहे. आज 17 मे रोजी रात्री बापाच्या डोळ्या देखत लेका वर वीज कोसळल्याने मुलगा ठार तर एक किरकोळ जखमी झाल्याची दुदैवी घटना हिवराखंड ता. लोणार येथे घडली.

शंकर प्रभू खंड (15) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अंबादास लबडे (16) रा. लेंडी पिंपळगाव असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.शंकर व त्याच्या मामाचा मूलगा हे दोघे वडील प्रभू खंड यांच्या सोबत शेतात गुरांना चारापाणी करण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने कोसळायला सुरुवात केली. दरम्यान वीज अंगावर पडल्याने गुरांना चारापाणी करत असलेला शंकर वज्रघातने ठार झाला. तर अंबादास हा या घटनेत किरकोळ जखमी झाला.ही घटना शंकर यांच्या वडिलांनी आपल्या डोळ्या समोरून पाहिली. या दुर्दैवी घटनेने गावावर शोककाळा पसरली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!