spot_img
spot_img

BREAKING भोंदू खरात घोटाळा वाढतोय; अध्यक्ष कोयटे गेले, आता बुलढाण्यात कोण अडचणीत? बुलढाण्यापर्यंत धडकणार तपास? फेडरेशन प्रमुखांनी टाकली शरणागती!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणानं राज्यात खळबळ उडवली असतानाच आता या प्रकरणात दुसरी मोठी विकेट पडली आहे. राज्यभर तब्बल 15 हजार पतसंस्थांचं जाळं असलेल्या फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर प्रकरणानंतर हा मोठा राजकीय आणि आर्थिक धक्का मानला जातोय.

अशोक खरात याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण, भाविकांची फसवणूक आणि कोट्यवधींची आर्थिक उकळपट्टी केल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात शिर्डी येथील समता पतसंस्थेत शेकडो संशयास्पद खाती उघड झाल्याने संपूर्ण यंत्रणा हादरली आहे.विशेष म्हणजे या खात्यांमध्ये मोठ्या राजकीय व्यक्तींशी संबंधित नावे समोर येत असल्याने तपास अधिकच तापला आहे.

शिर्डी पोलिसांकडून सध्या 100 हून अधिक संशयित खात्यांची चौकशी सुरू असून, काही खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड होत आहे. याच दबावामुळे आणि वाढत्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काका कोयटे यांना पद सोडावं लागल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातही या फेडरेशनचा मोठा प्रभाव असल्याने स्थानिक पतसंस्थांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अनेक पतसंस्थांचा या नेटवर्कशी थेट-अप्रत्यक्ष संबंध असल्याने आता बुलढाण्यातही तपासाची झळ पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

राजकीय नातेसंबंध, कोट्यवधींचे व्यवहार आणि बनावट खात्यांच्या जाळ्यात अडकलेलं हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चाललं आहे. पुढे आणखी किती मोठी नावे उघड होणार? आणि या आर्थिक साम्राज्याचा खरा मास्टरमाइंड कोण? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!