spot_img
spot_img

💥दुर्दैवी! चिखलीत अपघात: पृथ्वीराजचा मृत्यू, ओमप्रकाश गंभीर – जबाबदार कोण? ‘मी पुन्हा घरी येईन’ म्हणणारा पृथ्वीराज परतलाच नाही…

चिखली (हॅलो बुलडाणा / सय्यद साहिल)  खामगाव-जालना बायपासवरील पुंडलिकनगर कमानाजवळ दोन दुचाकींच्या भीषण अपघातात पृथ्वीराज अजय सुरडकर (वय 19, रा. सोमठाणा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून ओम प्रकाश इंगळे हा गंभीर जखमी झाला.अपघात इतका जोरदार होता की पृथ्वीराजला उपचारार्थी प्राण गमवावे लागले. तातडीने त्याला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गंभीर जखमी ओम प्रकाश इंगळेला तात्काळ जवंजाळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले

कर्तव्यदक्ष RTO अधिकारी निखिल ठाकूर यांनी तत्परता दाखवत स्वतःच्या वाहनातून जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवले. मयत पृथ्वीराज हा आखाडे हॉस्पिटलमध्ये काम करत होता. तो कामानिमित्त बाहेर गेला असता ही दुर्दैवी घटना घडली.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून युवकाच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून पुढील तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!