बुलढाणा (हॅलो बुलढाणा) रोज गुन्हेगारांच्या मागे धावणारी पावलं, आता मैदानावर पदकांसाठी धावणार आहेत. ३७ व्या अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ चा आज बुलढाण्यात मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने औपचारिक शुभारंभ झाला.
“व्यक्तीच्या आयुष्यात खेळाचं असाधारण महत्त्व आहे. मैदानी खेळातून व्यक्तीचं शरीर आणि मन निरोगी राहतं.” खाकी वर्दीमागचा माणूसही फिट असलाच पाहिजे, असे उद्घाटन प्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांनी प्रतिपादन केले.
पोलीस कवायत मैदानावर सकाळी १० वाजता विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. मान्यवरांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली, आणि क्षणातच मैदानाचं वातावरण स्पोर्ट्स फिव्हरने भारून गेलं.
या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. ही स्पर्धा २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे. अमरावती परिक्षेत्रातील अमरावती ग्रामीण, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती ग्रामीण, पोलीस आयुक्तालय अमरावती शहर या घटकातील तब्बल १०९४ स्पर्धक यात सहभागी झाले आहेत. ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, ज्युडो, तायक्वांडो, ड्यु, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग, हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, हॅण्ड बॉल, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रॉस कंट्री १० कि.मी., जलतरण असे एकूण १७ खेळ यात होणार आहेत. पोलीस कवायत मैदान, जिल्हा क्रीडा संकुल, सहकार विद्या मंदिर, जिजामाता प्रेक्षागृह आणि खामगाव येथील जी.एस. कॉलेज येथे हे सामने रंगणार आहेत.
▪️बुलढाणा पोलीस दलाने केली जय्यत तयारी!
या स्पर्धेचं प्रास्ताविक पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केलं. यावेळी प्रदीप पाटील अपर पोलीस अधीक्षक खामगाव, विलास यमावार
उपविभागीय अधिकारी, संतोष खाडे उपविभागीय अधिकारी मेहकर, उपविभागीय अधिकारी मलकापूर
सोहन माछरे, उपविभागीय अधिकारी देऊळगावराजा अर्जुन ठोंबरे, सर्व ठाणेदार, शाखा प्रभारी अधिकारी आणि अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.













Total Users : 3822260