बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय, चिखली तहसील कार्यालय, एसडिओ कार्यालय संग्रामपूर,जळगाव जामोद तहसील कार्यालयातील अनेक अधिकारी- कर्मचारी एकाच जागी 12 -13 वर्षा पासून कार्यरत असून खूर्चीला चिटकून बसलेत.गत काळात जिल्ह्यात नियमबाह्य बदल्या करण्यात आल्या.त्यामुळे मे 25 च्या बदल्या करतांना, नियमबाह्य बदल्यांची पुनरावृत्ती टाळावी,अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते प्रदीप भवर यांनी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील तेराही तहसील कार्यक्षेत्राच्या विकासाचा समतोल साधायचा असेल तर एकाच जागी 12 ते 13 वर्ष कार्यरत कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपुष्टात आणावी लागेल. संग्रामपूर तहसील कार्यालय व जळगाव जामोद तहसील कार्यालयात पुरेसे कर्मचारी नाहीत. त्यामुळे जनतेचे काम होत नाही.चपराशी या पदावरून लिपिक पदावर पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले जाते.कर्मचाऱ्यांचा अभाव हा जिल्हा अस्थापना विभागाचा दोष दिसून येतो.चिखली तहसील कार्यालयात अनेक कर्मचारी तलाठी व मंडळ अधिकारी 15 वर्षापासून एकाच जागी असून जनतेला चांगली वागणूक देत नाहीत.विशेष म्हणजे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागाची अवलोकन केले असता,अनेक विभागात 12 ते 15 वर्षापासून एकाच टेबलावर काम करणारे कर्मचारी दिसून येतात.असे निवेदनात म्हटले आहे.दरम्यान माहे जून 2023 च्या कालावधीत केलेल्या नियमबाह्य बदल्यांची पुनरावृत्ती माहे मे 2025 च्या बदल्या करताना टाळावी,अन्यथा जनहित याचिका दाखल करू असा इशाराही प्रदीप भवर यांनी निवेदनातून दिला आहे.