मुंबई (हॅलो बुलडाणा/ वृत्तसंस्था) मुंबईत Parle-G कंपनीच्या अनेक ठिकाणी आज सकाळपासून आयकर विभागाची मोठी छापेमारी सुरू आहे. फॉरेन असेट युनिट आणि मुंबई इनकम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन विंगकडून ही तपासणी केली जात आहे. Parle-G, मोनॅको आणि इतर ब्रँड नेमखाली बिस्किटे विकणाऱ्या या कंपनीवर अचानक झालेल्या या कारवाईने उद्योग वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अचानक झालेल्या या छापेमारीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, मोठ्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयकर विभाग सध्या कंपनीचे आर्थिक दस्तऐवज आणि व्यवहारांची कसून तपासणी करत आहे.
FY24 मध्ये Parle-G चा जबरदस्त नफा
2023-24 या आर्थिक वर्षात Parle-G च्या नफ्यात मोठी वाढ झाली. पीटीआयच्या अहवालानुसार, कंपनीचा निव्वळ नफा दुपटीने वाढून 1,606.95 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. FY23 मध्ये हा नफा 743.66 कोटी रुपये होता. कंपनीची ऑपरेशनल इनकम 14,349.4 कोटी रुपये झाली असून, रेव्हेन्यू 5.31% ने वाढून 15,085.76 कोटींवर पोहोचला आहे.इतक्या मोठ्या आर्थिक वृद्धीनंतर आयकर विभागाने कंपनीच्या व्यवहारांवर लक्ष केंद्रित केले आहे. छापेमारीनंतर यामागचे कारण स्पष्ट होईल. पण देशातील एका मोठ्या बिस्किट कंपनीवर सुरू असलेल्या या तपासणीने उद्योग क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.