बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भोपाळ येथे झालेल्या ग्लोबल इन्वेस्टर मीट कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राच्या यशाची धडाकेबाज मांडणी करण्यात आली. महाराष्ट्राचा सहकार इतक्या पुढे गेला आहे, हे ऐकून मध्य प्रदेशच्या नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.या महत्वपूर्ण चर्चासत्रात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, सहकार मंत्री विश्वास सारंग, केंद्र सरकारचे जॉईंट सेक्रेटरी सत्येंद्र जैन, सहकार आयुक्त मनोज पुष्प आणि ACS अशोक वर्गवाल यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस लॉजिस्टिक आणि सहकाराच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांवर सखोल चर्चा झाली. या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी लवकरच मध्य प्रदेश सरकारचे शिष्टमंडळ बुलढाणा अर्बनला भेट देणार आहे.या बैठकीत महाराष्ट्राच्या सहकारी धोरणांचा प्रभाव दिसून आला असून, मध्य प्रदेश सरकारही सहकाराच्या नव्या संधींसाठी पुढाकार घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळाले आहेत.