बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम कुणाला माहित नाही? हा कार्यक्रम आणि अमिताभ बच्चन प्रत्येकांच्या गळ्यातले ताईत बनले आहे.या कार्यक्रमात एका स्पर्धकाला बच्चन यांनी बुलढाण्यातील आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या विषयी प्रश्न विचारला..त्यामुळेगल्लीतील माणूस दिल्लीतही गाजत असल्याचे आनंददायी दृश्य आहे.’कौन बनेगा करोडपती’ हा भारतीय दूरचित्रवाणीवरचा एक प्रसिद्ध हिंदी रियालिटी गेम शो आहे. प्रश्नमंजूषेचे स्वरूप असलेल्या या कार्यक्रमात विजेत्यास सात कोटी रुपयांपर्यंतचे बक्षिसे दिली जातात. (युनायटेड किंग्डम)च्या प्रसिद्ध मालिकेवरून प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम भारतात निर्माण करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात २००० साली झाली. अमिताभ बच्चन यांनी आपल्या कौशल्यावर या कार्यक्रमास नवीन उंचीवर नेले. दरम्यान प्रश्नमंजुषातील एक प्रश्न एका स्पर्धकाला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर विचारण्यात आला आहे.ही बुलढाणा जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.
- Hellobuldana