spot_img
spot_img

ज्येष्ठ पत्रकारांना ‘कामदार’ जिल्हाध्यक्षांकडून ‘दमदार’ सलामी! – ‘पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कार’ने बुलढाण्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा ‘पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कारा’ने होणार सन्मान समाजहितार्थ लेखणी झिजवून आयुष्य समर्पीत करणाऱ्या पत्रकार तथा वृत्तपत्रविक्रेत्यांना बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून ‌‘पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात येत आहे. ‘कामदार’ जिल्हाध्यक्षांकडून ‘दमदार’ कामगिरी करून हा ऐतिहासिक कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला आहे रविवार, 16 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बुलढाणा येथील गर्दे सभागृहात पुरस्कार वितरण होईल. या सोहळ्याला द-बायोस्कोपचे संपादक तथा प्रसिद्ध वृत्त निवेदक प्रसन्न जोशी यांची विशेष उपस्थिती लाभणार असून केेंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव तसेच राज्याचे कामगार मंत्री ना. ॲड. आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते जिल्हाभरातील ज्येष्ठ पत्रकारांना मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक विद्याधर महाले आणि काही आमदार महोदय तथा समाजशील मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा रंगेल. मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस सुरेश नाईकवाडे सोहळ्याचे अध्यक्ष आहेत.

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेने प्रत्येक वेळी वृत्तधर्म निभावला आहे. अनेक पत्रकारांनी आपली लेखणी झिजवून पत्रकारितेसाठी आयुष्य समर्पीत केले आहे. अशा, वयाची 60 वर्षे पूर्ण केलेले किंवा त्यापेक्षा अधिक ज्येष्ठ पत्रकारांचा ‌‘पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कार‌’ देवून बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ सन्मान करीत आहे. रविवार, 16 फेब्रुवारी सकाळी 10.30 वाजता होत असलेल्या या सोहळ्याला वरील मान्यवरांव्यतिरीक्त आमदार संजय गायकवाड, आमदार धीरज लिंगाडे, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार मनोज कायंदे आणि बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांची विशेष उपस्थिती राहणार. बुलढाण्याचे मुख्याधिकारी गणेश पांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे, अदिती अर्बनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश देवकर, मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक राजेश डिडोळकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळा सजणार आहे.
विशेष म्हणजे, याच दिवशी सायंकाळी 4 वाजता गर्दे हॉलमध्ये डिजीटल मिडीया कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. व्हिडीओ प्रॉडक्शन ॲण्ड डिजीटल कन्टेन्ट तज्ञ प्रथमेश गोगारी कार्यशाळेला मार्गदर्शन करतील. मिडीया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपाध्यक्ष अनिल उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा होत आहे. पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कार सोहळा तसेच डिजीटल मिडीया कार्यशाळेला जिल्हाभरातील पत्रकार बांधवांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन रणजीतसिंग राजपूत, वसीम शेख अन्वर, प्रशांत देशमुख, कासिम शेख, युवराज वाघ, गणेश निकम, शिवाजी मामनकर, रविंद्र गणेशे, संतोष लोखंडे, डॉ. अनिल मापारी, गजानन राउत, ब्रह्मानंद जाधव, विश्वास पाटील, मृणाल सावळे, किशोर खंदारे, निनाजी भगत, प्रेमकुमार राठोड, बाबासाहेब जाधव, विजय देशमुख, पंजाबराव ठाकरे, डॉ. संजय महाजन, डॉ. भागवत वसे इत्यादी पदाधिकारी व सदस्य बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ, तालुका पत्रकार संघ, बुलढाणा शहर पत्रकार संघ आणि जितेंद्र कायस्थ, मयुर निकम, दीपक मोरे, इफ्तेखार खान आदि पदाधिकारी व सदस्य बुलढाणा जिल्हा डिजीटल मिडीया परिषदेने केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!