बुलढाणा (हॅलो बुलडाणा) येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, मुक्त पत्रकार, बालवाचन चळवळीचे प्रणेते, ग्रंथपाल स्वर्गीय नरेंद्र लांजेवार यांच्या तिसर्या स्मृतीदिनानिमित्त सुरेश भट गझल मंच पुणे प्रस्तुत गझलरंग या दर्जेदार मराठी गझल मुशायराचे आयोजन करण्यात आले आहे. या गझल मुशायराचे सूत्रसंचालन शाहीर सुरेशकुमार वैराळकर हे करणार आहेत.
या गझल मुशायरा मध्ये गोपाल , राज रणधीर, प्रियंका गिरी, आत्माराम जाधव कीर्ती वैराळकर इंगोले, अश्विन मोरे, डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे अपूर्व राजपूत हे शायर व गझलकार सहभागी होणार आहेत. दिनांक 13 फेब्रुवारी गुरुवारी सायंकाळी ठीक 06.30 वाजता गोवर्धन सभागृह बुलढाणा अर्बन मुख्यालय समोर येथे या गझल मुशायराचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमासाठी बुलढाणा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष डॉ.सुकेश झंवर यांचेसह जेष्ठ गझल अभ्यासक शिवाजी जवरे , प्रज्ञा लांजेवार यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमासाठी गझल रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. गणेश गायकवाड,प्रा. डॉ.कि.वा.वाघ यांचेसह स्व. नरेंद्र लांजेवार मित्रपरिवार, सहर ए गझल अकादमी बुलढाणा व प्रगती वाचनालय परिवार बुलढाणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.