spot_img
spot_img

अलनिनोचा इशारा; शेतीत बदल करा! – डॉ. संजय कुटे यांचा थेट सल्ला

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) खरीप हंगाम तोंडावर असताना प्रशासन सतर्क झाले असून, योगा हॉल येथे पार पडलेल्या खरीप पूर्व आढावा सभेत माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांनी शेतकऱ्यांना थेट इशारा देत आधुनिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. “यंदा अलनिनोचा प्रभाव राहणार, त्यामुळे पारंपरिक पद्धतींवर अवलंबून राहू नका,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.

कृषी तंत्रज्ञानाचा जागर मोहिमेअंतर्गत झालेल्या या बैठकीत तहसीलदार पवन पाटील, प्रशांत पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कुटे यांनी औषधी पिके, आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यावर भर दिला. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहोचवण्यास मी कटिबद्ध आहे, असे आश्वासन देत त्यांनी जलसिंचनावरही जोर दिला.

कार्यक्रमात प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला, तर तज्ञांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनावर मार्गदर्शन करत पिवळे सापळे, पक्षी थांबे यांसारख्या उपायांचा वापर करण्याचे आवाहन केले.

मोठ्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांमुळे सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, मात्र आगामी संकट टाळण्यासाठी आता प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याचे स्पष्ट झाले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!