येळगाव (हॅलो बुलडाणा) प्रभू विश्वकर्मा जयंती आणि मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा एकाच दिवशी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. हा सोहळा चिखली रोडवरील येळगाव गावजवळ असलेल्या एमआयडीसी जवळ प्रभु विश्वाकर्मा यांच्या बांधण्यात आलेल्या मंदिरात साजरा झाला. हा सोहळा ३ दिवस चालला आहे.
दि ८ फेब्रुवारी रोजी म्हणजेच शनिवारी श्री च्या मूर्तीची मिरवणूक व धान्याधिवास तसेच ९ फेब्रुवारी रोजी रविवारी श्री गणेश पुजन, पुण्याहवाचन, मातृकापुजन नांदीश्राध्द व देवता स्थापना, होमहवन करण्यात आले आणि १० फेब्रुवारी रोजी सोमवारी प्रभू विश्वाकर्मा यांच्या मूर्तीचे दशगात्रस्नान, प्राणप्रतिष्ठा व अभिषेक, हवन तसेच पुर्णाहुती करण्यात आले आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
विश्वकर्मा हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे दैवत आहेत, ते सृष्टीचे निर्माते आणि शिल्पकार मानले जातात.भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ञ आहेत. त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका, पांडवासाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली. या नगरांच्या रचनेत, सौंदर्य, अचुकता व सुखसोयी यांचा मिलाप होता. ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत.या सोहळ्यात
जिल्ह्यातून समाजबांधव मोठ्या संख्याने उपस्थितीत होते. बुलढाणा सुतार समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ विजय खोलाडे ,
अध्यक्ष डॉ. विजय खोलाडे, कामगार नेते सतिश शिंदे, विश्वकर्मा पंतसंस्थाचे अध्यक्ष समाधान सुरोशे, गजानन बोराडे, हिवरा आश्रमचे उपाध्यक्ष अशोक थोराते, दयानंद थोराते, शांताराम सोनुने, विजय बोराडे, सचिन राजगुरे, योगेश राजगुरे, अकुश बोराडे, राजु जाधव या सह आदी समाज बांधवांनी येथे सेवा दिली.