spot_img
spot_img

सैलानी यात्रोत्सवासाठी तयारीला वेग – लाखो भाविकांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू!

सैलानी (हॅलो बुलडाणा) येथे होणाऱ्या ११८व्या संदल व उर्स शरीफ यात्रोत्सवाच्या तयारीसाठी सोमवारी पंचायत समितीच्यावतीने समन्वय बैठक पार पडली. सैलानी बाबा दर्गा बिल्डिंगमध्ये झालेल्या या बैठकीत ८ मार्च ते २३ मार्च २०२५ दरम्यान होणाऱ्या यात्रोत्सवासाठी विविध विषयांवर चर्चा झाली.

देशभरातून लाखो भाविक सैलानी बाबांच्या दर्शनासाठी गर्दी करतात. विशेषतः ऐतिहासिक नारळ होळी सोहळ्यासाठी सैलानी नगरीत भाविकांचा जनसागर लोटतो. यात्रेदरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि सैलानी बाबा ट्रस्ट यांनी समन्वयाने उपाययोजना आखल्या आहेत.

बैठकीला उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विठ्ठल कुमरे, रायपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, ट्रस्टचे अॅड. संतोष वानखेडे आणि चांद मुजावर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. यात्रेदरम्यान सुरळीत व्यवस्था ठेवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यंदाचा यात्रोत्सव अधिक भव्य आणि सुव्यवस्थित होणार, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!