spot_img
spot_img

💥टूर्नामेंट गाजली! महिला क्रिकेटर मिताली राजने टोलवला आशावादाचा चेंडू! म्हणाल्यात.. ‘स्किल असेल तर बुलढाण्यातील खेळाडू भारतीय संघात खेळू शकेल!’ -आमदार गायकवाड यांच्यावरही उधळली स्तुती सुमने!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आमदार संजय गायकवाड यांनी क्रिकेटपटूंसाठी चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध केलाय. बुलढाणा शहराचे नाव जर उज्वल करायचे असेल तर,अशा टूर्नामेंट आयोजित व्हायला हव्या, यातूनच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील.. स्किल असेल तर या मातीतला खेळाडू भारतीय संघात देखील दाखल होईल,अशा शब्दात भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार मिताली राज यांनी आशावाद व्यक्त केला.

आमदार चषक 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी महिला क्रिकेटर मिताली राज आल्या असता, त्या बोलत होत्या. शहरातील जिजामाता प्रेक्षागार येथे लॉन, प्रेक्षक गॅलरी,व डे-नाईट मैदानाचा भूमिपूजन सोहळा आमदार गायकवाड यांच्या उपस्थितीत महिला क्रिकेटर मितालीजी राज यांच्याहस्ते संपन्न झाला. शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून
धर्मवीर आखाडा बुलढाणाच्या सौजन्याने भव्य या आमदार चषक चे आयोजन करण्यात आले होते. या आमदार चषक टेनिस क्रिकेट अंतिम सामन्यासाठी भारताच्या माजी महिला कर्णधार मिताली राज यांचे आगमन झाले होते.त्यांचे व आमदार गायकवाड यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान प्रथम क्रमांकाचे 7,77,777 रुपयाचे पारितोषिक राजा शिवछत्रपती क्रिकेट टीमला तसेच द्वितीय क्रमांकाचे 3,33,333 रुपयाचे पारितोषिक त्रिशा-11 ला आमदार संजय गायकवाड यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.
सदरसामने यशस्वी होण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले यामध्ये प्रामुख्याने युवासेना महाराष्ट्र राज्यकार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर आखाडा अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड, नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती आशिष जाधव, किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, विजय दुरणे,पवन भालेराव, जीवन उबरहंडे, प्रसाद फदाट, राजू पाटील,नितीन नेमाने,विशाल खंडारे, सागर उबाळे, स्वप्निल पाटील, बाळा देशमुख उमेश बर्डे,चेतन सोनुने, समालोचक ओम सोनुने यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!