spot_img
spot_img

पत्रकारांनी हा लाभ घ्यावा! – बुलढाणा तहसीलदारांचे आवाहन!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील पत्रकार किंवा पत्रकारांच्या कुटुंबातील सदस्य शेतकरी असतील तर त्यांनी जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन आपला फॉर्मर आयडी नोंदवावा तसेच आयुष्यमान भारत योजनेचे हेल्थ इन्शुरन्स सुद्धा नोंदवून घ्यावे,असे आवाहन बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी केले आहे.

सरकारी योजनांसाठी आता शेतकऱ्यांना फार्मर युनिक आयडी ‘ॲग्री स्टॅक’ बनवणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने ॲग्री स्टॅक प्रोग्राम अंतर्गत आपले शेतजमीन आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.अन्यथा शेतकऱ्यांना पीएम किसान, पीक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही.त्यामुळे फार्मर युनिक आयडी आवश्यक आहे.शिवाय आयुष्मान भारत योजनेचे हेल्थ इन्शुरन्स नोंदवून लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!