बुलढाणा (हॅलो बुलडाणा) कर्तव्यावर असताना,आज अघटीत घडले.जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील पाटील यांचे हृदयविकाराने कर्तव्यावर असतांना निधन झाले आहे.त्यांना ग्रंथालयातील देव समजले जायचे!
ते नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात गेले होते.परंतु एकाएकी मृत्यूने डाव साधला. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते देवाला प्रिय झाले.त्यांच्या अचानक जाण्याने बुलढाणा ग्रंथालयीन कर्मचारी, अधिकारी यांचेवर शोककळा पसरली आहे.