चिखली (हॅलो बुलडाणा) शहरातील नामांकित उद्योजक आणि राजघराणे कापड दुकानाचे मालक विष्णू पाटील पडघान (वय 75) यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. काल सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास हिवरा आश्रम येथून चिखलीकडे येत असताना पोखरी फाट्याजवळ त्यांची इनोव्हा कार ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकली. या अपघातानंतर त्यांच्यावर आणखी एका इनोव्हा गाडीची जोरदार धडक बसली. या दुहेरी अपघातात विष्णू पडघान यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा ड्रायव्हर थोडक्यात बचावला.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य आणि चिखलीतील प्रतिष्ठित व्यापारी असलेल्या विष्णू पडघान यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने व्यापारी, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे