spot_img
spot_img

BIG BREAKING! जन्मदात्याचाच काळ बनला पोटचा गोळा! वडिलांच्या रक्ताने माखला मुलाचा कोयता; मलकापूरच्या उमाळीत रात्री ११ वाजता थरार! १९ वर्षांच्या मुलाने ५० वर्षीय बापाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना; पण बापलेकात असं नेमकं काय घडलं की घरातच रक्ताचा सडा पडला? हत्येमागचं गूढ कायम, अख्खं गाव हादरलं!

मलकापूर (हॅलो बुलढाणा/करन झनके) जन्म दिला… लहानाचं मोठं केलं… आयुष्यभर कष्ट उपसले… अन् त्याच जन्मदात्या बापाच्या रक्ताने घराचा उंबरठा माखला! मलकापूर तालुक्यातील उमाळी गावात गुरुवारी (१५ ऑक्टोबर) रात्री अकराच्या सुमारास घडलेल्या हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. अवघ्या १९ वर्षांच्या मुलावर आपल्या ५० वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. मात्र, या रक्तरंजित घटनेला आता आणखी एक धक्कादायक वळण मिळाले आहे. वडिलांच्या हत्येसाठी आईनेच मुलाला चिथावणी दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे!

 

घरात धुमसणाऱ्या वादाचा शेवट रक्ताच्या थारोळ्यात!

मृत सोपान नामदेव चव्हाण (५०) यांचा मुलगा दीपक सोपान चव्हाण (१९) हा कामधंदा करीत नसल्याने कुटुंबात वारंवार वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. यापूर्वी पत्नी आशा चव्हाण हिने सोपान यांना रस्त्यावर मारहाण केल्याचाही आरोप आहे.

गुरुवारी रात्री पुन्हा बापलेकात वाद पेटला. काही क्षणांतच वादाने भयंकर रूप धारण केले. फिर्यादीनुसार, दीपकने धारदार हत्याराने वडिलांच्या हनुवटीवर आणि मानेवर वार केले. या हल्ल्यात सोपान चव्हाण यांचा मृत्यू झाला.

आईचाही कटात सहभाग? पोलिसांसमोर मोठे आव्हान!

या प्रकरणी मृताचे नातेवाईक भागवत नामदेव चव्हाण (५५) यांच्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी दीपक आणि त्याची आई आशा चव्हाण यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) व ५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक सतीश महल्ले पुढील तपास करीत आहेत

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!