spot_img
spot_img

EXCLUSIVE! शंकर जिनिंगच्या मागे रक्ताचे पाट अन् मांसाचा खच! नालीत श्वानांची मेजवानी; डोणगाव-आरेगाव रस्त्यावर नेमकं घडलं तरी काय? कुणी टाकले मांसाचे तुकडे? परिसरात खळबळ; प्रशासनासमोर मोठं गूढ!

डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) रस्त्याच्या कडेला रक्ताचे सडे… जागोजागी मांसाचे तुकडे… अन् नालीत पडलेल्या मांसावर ताव मारणारे मोकाट श्वान! हे अंगावर काटा आणणारे दृश्य डोणगाव-आरेगाव रस्त्यावरील शंकर जिनिंग परिसरात समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शंकर जिनिंगजवळून जाणाऱ्या पादचाऱ्यांना रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर रक्त आणि मांसाचे तुकडे आढळले. मात्र, खरा धक्का बसला तो जिनिंगच्या पाठीमागील नालीतील दृश्य पाहून! तेथेही रक्त आणि मांसाचे तुकडे पडलेले असून मोकाट कुत्रे ते फस्त करत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.

हे मांस नेमके कोणत्या प्राण्याचे? येथे काही अनुचित प्रकार घडला का? की कुणी मुद्दाम मांसाची विल्हेवाट लावली? या प्रश्नांनी परिसरात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, यापैकी कोणत्याही शक्यतेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

रक्त-मांसामुळे दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्त आणि मांस आले कुठून? प्रशासन तातडीने घटनास्थळी पंचनामा करून सत्य बाहेर आणणार का? या रहस्यमय प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!