spot_img
spot_img

BIG BREAKING बुलढाणा जिल्हा परिषद हादरली! जिल्हा परिषदेत लाचखोरांचा सुळसुळाट! ACB च्या जाळ्यात दोन कर्मचारी! कामासाठी पैशांची मागणी करणे पडले महागात; तांदूळकर आणि खर्चे यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्हा परिषदेचा कारभार म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सर्वसामान्यांच्या कामांसाठी पैशांची मागणी करणाऱ्या दोन लाचखोर कर्मचाऱ्यांवर अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

▪️नेमकं घडलं काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जिल्हा परिषदेतील एका कामासाठी तक्रारदाराकडे तांदूळकर आणि खर्चे या दोन कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी केली होती. तक्रारदाराने थेट ACB कडे धाव घेत तक्रार दाखल केली. ACB ने सापळा रचून दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.

▪️जिल्हा परिषद म्हणजे लाच मागण्याचे कुरण?

जिल्हा परिषदेतील प्रत्येक टेबलावर पैशाशिवाय फाईल हलत नाही, अशी नागरिकांमध्ये आधीपासूनच चर्चा आहे. शेतकऱ्याच्या, मजुराच्या, सर्वसामान्य माणसाच्या छोट्या-मोठ्या कामांसाठीही हजारो रुपयांची मागणी केली जाते. आजच्या कारवाईमुळे या चर्चेला पुन्हा एकदा पुष्टी मिळाली आहे.

▪️ACB ची अधिकृत कारवाई सुरू!

ACB पथकाने दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे. लाचेची रक्कम किती होती, यामागे आणखी कोण कोण आहेत, वरिष्ठांचा यात हात आहे का, या सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
या धाडीमुळे जिल्हा परिषदेतील इतर लाचखोरांचे धाबे दणाणले असून, “आता पुढचा नंबर कोणाचा?” अशी कुजबुज कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!