बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्याचे मातृतीर्थ असलेल्या भूमीतील सुप्रसिद्ध प्रेस फोटोग्राफर निनाजी भगत यांचा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात संपादित केलेल्या कॉफी टेबल बुकमध्ये भगत यांनी टिपलेल्या काही अप्रतिम छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. या कौतुकास्पद योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटूरवार, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड आणि सतिश वाघमारे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. फोटोग्राफरच्या आयुष्यात असे सन्मान दुर्मीळ असतात, असे सांगत निनाजी भगत यांनी जिल्हा प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.