बुलढाणा (हॅलो बुलडाणा) स्थानिक गुन्हे शाखा म्हणजे जिल्हा पोलीस यंत्रणेचे कान नाक डोळे! गुन्ह्यांचा छडा लावणे हे स्थागुशाला च जमावे…असे कार्य त्यांचे सध्या सुरू आहे.या कार्य कर्तृत्वामुळे आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.बाजड यांनी २१ किलो चांदी व २१ तोळे सोने जप्तीची कारवाई केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील पो.स्टे. सिंदखेड राजा अप.नं. १५३ / २०२४ कलम ३०५, ३३१ (४) भा. न्या. सं, पो. स्टे. लोणार ३२६/२४ कलम ३०९ (४), ३५१ (२), ३ (५) भा. न्या. सं. प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान अत्यंत जलद, गोपनिय व तांत्रिक माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करुन गुन्ह्यांतील आरोपी निष्पन्न व अटक करुन त्यांचेकडुन २१ किलो चांदी,२१ तोळे सोने व इतर मुद्देमाल असा एकुण ३७ लाख ७७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीस उपनिरीक्षक प्रतापराव बाजड यांनी हस्तगत केला.या गंभीर आणि संवेदनशिल गुन्ह्यांचा तपास बुध्दीकौशल्य व अविरत प्रयत्न करुन क्लिष्ट-स्वरुपाचे गुन्हे उघडकीस आणले. त्यामुळे पोलिसांची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी बाजड यांची उल्लेखनीय कामगिरी समजल्या जात आहे.त्यामुळे पोलीस उपनिरीक्ष प्रतापराव बाजड यांना आज प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.