चिखली (हॅलो बुलडाणा / सय्यद साहिल) शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्तसंचार हैदोस माजवत असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे जीव धोक्यात आले आहेत. चिंच परिसर, संभाजी नगर, बाबुलॉज चौक, जयस्तंभ चौक, बसस्थानक परिसरासह गर्दीच्या ठिकाणी कळपाने जनावरे थाटात रस्त्यावर ठाण मांडून बसलेली दिसतात.
नगर परिषदेकडून बाबुलॉज चौकात कोंडवाडा तयार करण्यात आला आहे, मात्र तो अद्याप कार्यान्वित झालेला नाही. नागरिकांसाठी ही प्रतीक्षा सहनशक्तीच्या पलीकडे गेली असून अपघातांची संख्याही वाढली आहे. जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, तर स्थानिक प्रशासनाचा निष्क्रियपणा चांगलाच चव्हाट्यावर आला आहे.
कोंडवाडा त्वरित सुरू करून मोकाट जनावरांवर उपाययोजना कराव्यात, अन्यथा संतप्त नागरिक आंदोलन छेडतील, असा इशारा देत आहेत. प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि जनावरांच्या हैदोसामुळे नागरिक त्रस्त असून ठोस कृतीची मागणी केली जात आहे.