spot_img
spot_img

भावा..’रस्ताच थकला!’ बांधकाम विभाग झोपला.. खड्डे पडले..जागोजागी उखडला!

देऊळगाव राजा (संतोष जाधव/ हॅलो बुलढाणा) गावागावात खराबखड्डेयुक्त रस्त्यांची समस्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक सततचेगंभीर रडगाणे बनले आहे. रस्त्यावर चालून चालून प्रवासी थकत असतात मात्र देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहाँगीर फाटा ते खल्याळ गव्हाण हा रस्ताच सध्या थकला आहे. जिकडे तिकडे खड्डेच खड्डे..रस्ता गेला कुणीकडे?अशी या रस्त्याची स्थिती झाली असून हा रस्ता दररोजच्या वाहतुकीसाठी जीवघेणा ठरत आहे.पावसाळ्यापूर्वीच रस्ता दुरुस्तीची गरज असते परंतु येथील सार्वजनिक बांधकाम विभाग झोपल्याचे दिसते.

अलीकडे शहरातील आणि गावातील रस्त्यांची रडकहाणी ऐकायला कोणी तयार दिसत नाही. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था होऊन वाहनधारक त्रस्त होत आहेत. खड्डे चुकावीत असताना वाहनधारकाची मोठी कसरत होते. नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे नेहमीचेच समीकरण आहे. उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघात होतो. नागरिकांचा नाहक बळी जातो. तरीही प्रशासन ढिम्म असते. आता तर पावसाने सिनगाव जहाँगीर फाटा ते खल्याळ गव्हाण या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पाडलेत. पावसाचे पाणी खड्ड्यात साचून अपघाताला निमंत्रण मिळत आहे. निकृष्ट दर्जाचे रस्ते असल्योन रस्ते सतत उखडतात.
खरेतर या रस्त्यातील खड्डे बुजवून नव्याने डांबरीकरण पावसाळ्यापूर्वीच करणे अपेक्षित असते. पण, संबंधित विभागाने लक्ष देतो कुठे? त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करून रस्ता सुरक्षित व योग्य करावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना सामाजिक कार्यकर्ते योगेश मिसाळ यांनी निवेदन देऊन केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!