spot_img
spot_img

CRIME NEWS! शेतीचे काम आटोपले अन् गावाकडे निघाले… चिखली बसस्थानकावर बस येताच गर्दी उसळली; मागून आला ‘तो’ हात अन् गळ्यातील ‘ओम’सह पावणेदोन लाखांचा सोन्याचा गोफ गायब! ८० वर्षीय शेतकऱ्याच्या आसपास कोण घुटमळत होतं?

चिखली (हॅलो बुलढाणा) चिखली बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ८० वर्षीय शेतकऱ्याच्या गळ्यातील तब्बल १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा गोफ लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसमध्ये चढण्याच्या गडबडीत चोरट्याने मागून गोफ तोडला; मात्र काही क्षणांत तो गर्दीत गायब झाला!

उदयनगर येथील रामकृष्ण गणपतराव उपाध्ये हे ६ ऑगस्ट रोजी शेतीसंबंधी कामासाठी मित्र गजानन दगडू दुधाळे यांच्यासोबत चिखली येथील भूमी अभिलेख कार्यालयात आले होते. काम आटोपल्यानंतर दोघे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उदयनगरकडे जाणाऱ्या बसची वाट पाहण्यासाठी चिखली बसस्थानकावर पोहोचले.

दरम्यान, बार्शी ते शेगाव जाणारी बस फलाटावर येताच प्रवाशांची मोठी गर्दी झाली. उपाध्ये हे मित्रासोबत बसमध्ये चढत असतानाच अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील १३ ते १४ ग्रॅम वजनाचा, सोन्याचा ‘ओम’ असलेला गोफ मागून तोडून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

गोफ गळ्यात नसल्याचे लक्षात येताच उपाध्ये यांनी बससह आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. प्रवाशांकडे विचारपूसही केली; मात्र चोरट्याचा अथवा गोफाचा कोणताही मागमूस लागला नाही. अखेर त्यांनी १३ ऑगस्ट रोजी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. बसस्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये चोरट्याचा चेहरा कैद झाला का, याकडे आता लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!