मोताळा (हॅलो बुलडाणा) तहसीलदार हेमंत पाटील यांनी ॲक्शन मोडवर काम करत रस्त्यावर मातीने गच्च भरून वाहतूक करणाऱ्या ६ चाकी टिप्पर वाहनांवर कारवाई केली. हे टिप्पर इतके भरलेले होते की वाहतूक सुरू असतानाच माती रस्त्यावर पडत होती आणि मागील वाहनचालकांच्या डोळ्यांत माती जाऊन त्यांचा जीव धोक्यात येत होता.
या अक्षम्य दुर्लक्षामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तहसीलदार पाटील यांनी तत्काळ पाऊल उचलत टिप्पर जप्त केले आणि तहसील कार्यालयात जमा केले. याप्रकरणी प्रादेशिक परिवहन विभाग बुलढाणा यांना माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेमंत पाटील यांच्या या कारवाईने बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, रस्त्यांवरील सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा हा धडाका नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.














