बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने आज मोठी आणि धाडसी कारवाई करत गर्भलिंगनिदानाचा काळाबाजार उद्ध्वस्त केला. मा. वाकचौरे सर, उपसंचालक आरोग्य सेवा, अकोला मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली ही थरारक कारवाई पार पडली. गोपनीय माहिती मिळताच डॉ. बिराजदार यांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन करून सापळा रचला आणि संपूर्ण टीमला अचूक मार्गदर्शन केले. त्यांच्या सतर्कतेमुळे एक मोठा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
मेहकर तालुक्यातील प्रतापूर येथे श्री. अमोल रमेश रसाळ यांच्या घरी बोगस डॉक्टर अनिल रामदास सोनुने, राहणार हिंगोली, हा एका महिलेचे गर्भलिंगनिदान करत असताना दुपारी सुमारे 4 वाजता रंगेहाथ पकडण्यात आला. कारवाईदरम्यान त्याच्याकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन व इतर साहित्य जप्त करण्यात आले. ग्रामीण भागात अशा प्रकारे फिरत्या मशीनद्वारे अवैध गर्भलिंगनिदान सुरू असल्याचा संशय यामुळे अधिक बळावला आहे.
या कारवाईत डॉ. सुनिता हिवसे, वैद्यकीय अधीक्षक मेहकर, शहर पोलीस निरीक्षक श्री. आलेवार, श्री. बिरांजे, श्री. राठोड सहाय्यक पोलीस निरीक्षक, तसेच पोलीस कर्मचारी लक्ष्मण कटक, शिवनकर, संदीप भोंडाने, मोहम्मद परसु वाले, केशव अवचार, महिला पोलीस कॉन्स्टेबल सरकटे आणि ग्रामीण रुग्णालय मेहकर येथील आरोग्य पथकातील मंगला वायाळ सिस्टर, प्रशांत बोरे, शंकर वायाळ यांनी सहभाग घेतला.
सदर आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 61, 315, 335, 336, अवैध प्रॅक्टिस 33, पीसीपीएनडीटी Act कलम 3, 6, 18, 23, 25 तसेच बॉम्बे नर्सिंग होम Act कलम 4 व 5 नुसार कारवाई सुरू आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध आरोग्य माफियांना मोठा दणका बसला आहे.












Total Users : 3418097