डोणगाव (हॅलो बुलडाणा / अनिल राठोड) आठवडी बाजारात बाजारभावापेक्षा कमी किमतीत शेळ्या विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना नागरिकांच्या सतर्कतेमुळे व पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे अटक करण्यात आली.अकोला जिल्ह्यातील बाळापूर व बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेल्या सात शेळ्या चोरटे टाटा एस (MH 26 E1747) वाहनातून डोणगाव बाजारात विक्रीसाठी घेऊन आले होते. मात्र, कमी किमतीत विक्रीमुळे व्यापाऱ्यांना संशय आला. त्यांनी डोणगाव पोलिसांना माहिती दिली.
ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा पाठलाग करून गौरव शित्रे (22), कृष्णा इंगळे (19), आदित्य इंगळे (22) आणि गनेश वाठोरे (17) यांना अटक केली. चौकशीत चोरी उघडकीस आली.बाळापूर पोलिसांनी 5 शेळ्या व हिवरखेड पोलिसांनी 2 शेळ्यांची ओळख पटवली. सर्व पशुधन ताब्यात घेऊन आरोपींना बाळापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरी थांबवण्यात यश आले.