बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात सध्या चोरीचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या एका न्यूज चॅनलच्या पत्रकाराच्या घरी जवळपास 1 लाखाची घरफोडी झाल्याची बाब आज 15 जानेवारीला दुपारी 12 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे चोरांनी दूध मलाईवर ताव मारून एक लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की,एका न्युज चॅनेलचे जिल्हा रिपोर्टर संदीप वानखडे बुलढाणा शहरातील महाडा कॉलनीत राहतात.मागील 12 जानेवारीला ते परिवारासह बाहेर गावी गेले होते.आज बुधवारी दुपारी ते घरी परतले असता मुख्य द्वारचा कुलूप तुटलेला होता.त्यांनी आत जाऊन बघितले असता बेडरूम मधील अलमारीतील सामान अस्तव्यस्त पडलेला होता. त्यांनी पाहणी केली असता 9 ग्राम सोन्याची पोत आणि नगदी 35 हजार रुपये असा एकूण जवळपास 1 लाखांची चोरी झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली.इतकेच नव्हे तर या चोरट्यांनी फ्रिजमध्ये ठेवलेला दूध आणि मलाईचा देखील अस्वाद घेतला होता.पत्रकार संदीप वानखडे यांनी तात्काळ बुलढाणा शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांना घटनेची सूचना दिली असता शहर ठाण्याचे पथक आणि फिंगर प्रिंट युनिट त्यांच्या घरी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून ठसे घेतले.या प्रकरणी बातमी लिहे पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. म्हाडा कॉलोनी हा शहराचा विस्तारित भाग असून या परिसरात अनेक जण येऊन गांजा,दारूचा नशा करतात. या भागात कधीही पोलीस पेट्रोलिंग होत नसल्याची ओरड स्थानिक नागरिकाकडून होत आहे.