बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सातपुड्याच्या पायथ्याशी आणि मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा पडला.या दरोड्यात मूर्तीवरील आभूषणे लुटल्या गेली असून याची रक्कम एका लाखावर सांगण्यात येत आहे.
या घटनेची माहिती सोनाळा पोलिसांना विलंबाने प्राप्त झाली.त्यांचा तपास सुरू असून अध्यापही शोध लागेना..त्यामुळे याचे नवल हनुमान भक्त व्यक्त करीत आहेत.
सातपुड्याच्या पायथ्याशी पुरातन असे जागृत हनुमान मंदिर आहे.इच्छापूर्तीला पावणारा हनुमान अशी मनोकामना असल्याने राज्यभरातून भाविकांची या मंदिरावर मंदियाळी असते.दरम्यान या मंदिरावरही दरोडेखोरांनी दरोडा घातला. त्यामुळे दरोडेखोरांना देवाचे भय नसल्याचे दिसून येत आहे.