spot_img
spot_img

💥BREAKING! बुलढाण्यात नोकरीच्या नावाखाली 62 जणांना गंडा; गवळी कुटुंबीयांनी केली 1.96 कोटींची फसवणूक! – बुलढाणा पोलिसांची कारवाई: – फसवणूक करणाऱ्या गवळी कुटुंबाला कोंडले जाळ्यात!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तब्बल 62 जणांना गंडविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गवळी कुटुंबीयांनी बनावट कागदपत्रे आणि खोट्या प्रतीक्षा यादींच्या आधारे 1 कोटी 96 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक केली. मुख्य आरोपी निलेश गवळी (वय 31) याने पत्नी कोमल, वडील विजय आणि चुलत भाऊ अंकुश यांच्यासह हा गोरखधंदा चालवला.

सदर फसवणूक 2019 ते 2024 या कालावधीत घडली. नोकरीचे आमिष दाखवून पीडितांकडून वेळोवेळी रोख, चेक व ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे उकळले गेले. आरोपींनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक, आरोग्य सेवक, तसेच इतर सरकारी पदांसाठी खोट्या जाहिरातींनी लोकांना भूलथापा दिल्या. बनावट नियुक्तीपत्रे, मंत्रालयाचे खोटे शिक्के आणि दस्तावेज तयार करून फसवणूक केली गेली.

बुलढाणा पोलिसांनी निलेश गवळीसह चार जणांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुख्य तक्रारदार विश्वनाथ गव्हाणे आणि इतर पीडितांच्या म्हणण्यानुसार, आरोपी गवळी यांनी मंत्रालयातील सचिव कक्ष अधिकाऱ्यांचे बनावट शिक्केही तयार केले होते.

पैसे भरल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने अनेक पीडितांना मंत्रालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. अखेर आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मोरे करत आहेत.

गुन्ह्यातील 57 इतर पीडितांची नावे अजून गुप्त असून, त्यांची एकूण फसवणूक जवळपास दोन कोटींच्या घरात आहे. गवळी कुटुंबीयांची फसवणूक यंत्रणा उघड झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!