तमिळनाडू (हॅलो बुलडाणा/ वृत्तसंस्था) जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात गुरुवारी पहाटे भीषण चेंगराचेंगरी झाली, ज्यात 6 भाविकांचा मृत्यू झाला, तर 40 हून अधिक जखमी झाले. वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने 10 दिवस चालणाऱ्या वैकुंठ द्वार दर्शनासाठी टीटीडीने SSD टोकन वाटप सुरू केले होते. या टोकन्ससाठी तिरुपती आणि तिरुमला येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती.
बुधवारी संध्याकाळपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गुरुवारी पहाटे 5 वाजता विष्णू धाम काऊंटरवर टोकन्स वाटप सुरू झाले. परंतु गर्दीतून निर्माण झालेल्या गोंधळामुळे भाविकांमध्ये अफरातफर माजली आणि चेंगराचेंगरी झाली.
मृतांची संख्या वाढण्याची भीती
या दुर्घटनेत रुईया हॉस्पिटलमध्ये 4 तर सिम्स हॉस्पिटलमध्ये 2 भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.
टीटीडीच्या अनागोंदी व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
TTD ने SSD टोकन वाटपासाठी योग्य व्यवस्थापन केले नसल्याचा आरोप स्थानिक भाविकांनी केला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस आणि स्वयंसेवक कमी असल्यामुळे हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.