बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पत्रकारांना समाजाचा आरसा मानले जाते. चांगल्या कामगिरीसाठी बातम्यांमध्ये नाव हवेच असते, पण पत्रकार दिनाच्या शुभेच्छा द्यायला अनेकजण विसरतात.वर्षभर बातम्या पोहोचवणाऱ्या आणि सत्य समोर आणणाऱ्या पत्रकारांच्या कष्टाची कदर अनेकांना असते; मात्र त्यांची आठवण फक्त गरजेपुरतीच होते, हा अनुभव पत्रकारांना वारंवार येतो.शासकीय अधिकारी
राजकीय नेते, उद्योजक, कलाकार, आणि समाजातील अनेक प्रभावशाली व्यक्ती बातमीमध्ये स्थान मिळण्यासाठी पत्रकारांशी चांगले संबंध ठेवतात. पण पत्रकार दिनाचा साधा संदेश पाठवण्याची तसदी घेतली जात नाही. समाजाला माहिती, शिक्षण आणि मनोरंजनाच्या माध्यमातून समृद्ध करणाऱ्या या चौथ्या स्तंभाला पुरेशी मान्यता आणि आदर मिळावा, हीच अपेक्षा आहे.
यंदा पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारांच्या मेहनतीला सलाम करून त्यांचे योगदान ओळखले जावे, ही वेळेची गरज आहे. कारण पत्रकार हे फक्त बातम्या देणारे नाहीत, तर समाज परिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहेत.