spot_img
spot_img

💥EXCLUSIVE – आमदार गायकवाड हे वागणं बरं नव्हं! भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय राऊत म्हणाले…!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा संतापजनक आणि निषेधार्ह वाद समोर आला आहे. एका सत्कार समारंभात त्यांनी मतदारांविरोधात शिवराळ भाषा वापरत अपमानकारक विधान केले. “तुम्ही फक्त एक मत मला देऊ शकत नाही. फक्त दारू, मटण आणि पैसे. अरे दोन-दोन हजारात विकले गेले भाडXX साले. असे ते म्हणाले.

सामाजिक माध्यमांवर या विधानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. लोकप्रतिनिधींनी लोकशाहीचे भान ठेवावे अशी अपेक्षा असताना, गायकवाडांच्या या वर्तनाने मतदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. केवळ 894 मतांनी निसटता विजय मिळवणाऱ्या आमदारांनी अशा प्रकारे वागावे, ही गोष्ट नागरिकांना रुचलेली नाही.
मतदारांच्या संरक्षणासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी शपथ घेतलेल्या आमदारांनी सार्वजनिक सभेत मतदारांना अपमानास्पद शब्द वापरावे, हे अत्यंत लज्जास्पद आहे. “आमदारांची जीभ अशी घसरत असेल, तर लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह उभे राहते,” असा सूर सुज्ञ मतदारांमध्ये उमटत आहे.

गायकवाड हे पूर्वीपासून वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत ठरत असून, त्यांची जीभ कोणत्याही विषयावर कधीही घसरते, असे सामान्य नागरिकांमध्ये बोलले जात आहे. मात्र, लोकांच्या विश्वासावर निवडून आलेल्या नेत्यांनी मतदारांवरच तोंडसुख घ्यावे, ही घटना लोकशाही व्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर घाला असल्याचे मत व्यक्त होत आहे.

संजय राऊत म्हणाले!

“कोट्यवधी मतदारांना जर
कुणी वेश्या म्हणत असेल तर एकनाथ शिंदेंनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पैसे देऊन मतदान घेतलं असेल, चला मी मान्य करतो पण तुम्ही त्यांना वेश्या कसं काय म्हणता?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणले की…
बावनकुळे म्हणाले, “आम्ही कोणताही लोकप्रतिनिधी निवडून देतो, तो जनतेच्या सेवेसाठी निवडतो. त्यामुळे आम्ही जनतेचे सेवक आहोत. आणि जनसेवकाने जनता आणि मतदारांसमोर नतमस्तक होऊनच आपले काम केले पाहिजे.” बावनकुळे म्हणाले, ”छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु आपण स्वीकारला पाहिजे. आपण सेवकाच्या भूमिकेत राहिले पाहिजे. त्यांनी जे सांगितले त्यावर मला काहीही बोलायचे नाही. पण मतदार आणि जनता हीच आमची भूमिका आहे आणि आम्ही जनतेसमोर नतमस्तक होऊनच काम करतो.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!