बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चांडक लेआऊट, चिखली रोड परिसरात ‘लेक हक्काची वृद्धाश्रम’ या नावाने सुरू असलेला उपक्रम आज माणुसकीचे जिवंत उदाहरण ठरत आहे. सीमा धामणे या तरुणीने कोणतीही शासकीय मदत न घेता, स्वतःच्या जिद्दीच्या बळावर हा वृद्धाश्रम उभारला आहे. सध्या येथे 18 वृद्धांना आधार मिळत असून, आणखी 20 जण प्रतीक्षेत आहेत.
महागाईच्या काळात एकट्या व्यक्तीने एवढा मोठा सामाजिक उपक्रम चालवणे अत्यंत कठीण असतानाही सीमा धामणे यांनी हार मानलेली नाही. वृद्धांची काळजी, अन्न, औषधे आणि निवारा यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करत आहेत.
समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या वृद्धाश्रमाला आर्थिक मदत करावी, असे आवाहन राधेश्याम चांडक (भाईजी) यांच्या कडून करण्यात आले आहे. तसेच, घरी शुभ प्रसंग असल्यास 20 लोकांच्या जेवणाची व्यवस्था करून मदतीचा हातभार लावता येऊ शकतो. सकाळच्या जेवणासाठी सकाळी 8 वाजेपर्यंत आणि सायंकाळच्या जेवणासाठी दुपारी 4 वाजेपर्यंत सूचना द्यावी.













Total Users : 3456023