बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहर पोलीस निरीक्षक पदी संग्राम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे ठाण्याचा पदभार स्वीकारताच शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे नव्या दृष्टीकोनातून पाहिले जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, तत्कालीन ठाणेदार रवी राठोड यांची कंट्रोल रूममध्ये बदली करण्यात आली असून या निर्णयामागील कारणांबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
नवीन ठाणेदार म्हणून संग्राम पाटील यांच्यासमोर शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण, अवैध धंद्यांवर कारवाई आणि कायदा-सुव्यवस्था मजबूत ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. त्यांच्या कामगिरीकडे आता संपूर्ण बुलढाण्याचे लक्ष लागले आहे.










