बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मेहकर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात यांनी मिस ओलंपिया ठरलेल्या पौर्णिमा सोनुने यांचा मोठ्या उत्साहाने सत्कार केला. पौर्णिमा सोनुने यांना मिस ओलंपिया चा मान मिळाला असून, त्यांच्या या अद्वितीय कामगिरीवर जिल्ह्याला गर्व आहे.
सिद्धार्थ खरात यांनी पौर्णिमाच्या कष्टांची आणि जिद्दीची प्रशंसा केली आणि तिच्या यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात एक नवीन उंची गाठली आहे, असे सांगितले. त्यांनी शासकीय मदतीसाठी तात्काळ क्रीडा कार्यालय मुंबईचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि ते म्हणाले, “पौर्णिमाला जितके मदतीचे स्वरूप दिले जाऊ शकते, त्यासाठी मी तयार आहे.”
यावेळी मेहकर शिवसेना शहर प्रमुख किशोर गारोळे, सिटी न्यूज (हॅलो बुलडाणा) संपादक जितू कायस्थ, टॅटू टेम्पल चे संचालक संजय गोरले, पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे टिल्लू गोरले, ओम कायस्थ योगेश विसपुते,आणि अन्य शिवसैनिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पौर्णिमा सोनुने यांच्या कष्टाने आणि आमदार सिद्धार्थ खरात यांच्या मदतीची तयारी या दोन्ही गोष्टींमुळे नागरिकांच्या मनात एक सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.