spot_img
spot_img

क्राईम! चाकूच्या धाकावर बारमालकाला लुटले! – दोन आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी!

चिखली (हॅलो बुलडाणा) चाकूचा धाक दाखवून पैसे लुटणारे 2 आरोपी चिखली पोलीसांनी ताब्यात घेतले.या आरोपींची बुलढाणा जिल्हा कारागृह रवानगी करण्यात आली आहे.सै.समीर सै. जहीर व विशाल राजेश दांडगे रा.गोरक्षणवाडी चिखली असे आरोपींची नावे आहेत.

दोन्ही आरोपी यांनी गांधीनगर येथील राज वाईन बार मालक सुनील जिरवणकर यांना 3 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हॉटेलच्या काउंटरवर ते बसलेले असताना, गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देऊन गल्ल्यातील 1100 रुपये तर खिशातील 900 रुपये जबरीने काढून घेतले, अशी तक्रार देण्यात आली आहे.सदर आरोपींना चिखली पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आणि आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.ही कारवाई एसपी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!