शेगाव (हॅलो बुलडाणा) कल्याण परिसरात एका बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आणि संत नगरी शेगाव येथील लॉज मालकाला मोबाईल विकणाऱ्या आरोपी विशाल गवळीसह त्याची पत्नी साक्षी हिला शनिवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने 18 जानेवारीपर्यंत (14 दिवस) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर आरोपी शेगावातील एका लॉज मध्ये लपून बसले असतांना, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.याप्रकरणी सर्वप्रथम ‘हॅलो बुलढाणा’ ने बातमी प्रसारीत करून खळबळ उडवून दिली होती.
कल्याणमधील बालीकेवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्या प्रकरणी प्रमुख आरोपी विशाल गवळीला शेगावातील एका गावामधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.
23 तारखेला संध्याकाळी कल्याण पूर्वेतून बालीकेचे अपहरण झाले होते.आईकडून 20 रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती.बालीका परत न आल्याने कुटुंबाने मुलीचा शोध सुरू केला.मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली.24 डिसेंबर रोजी बालीकेचा मृतदेह कल्याण नजीक बापगाव परिसरात सापडला.दरम्यान पोलिसांनी तपासचक्र फिरविले असता, आरोपीवर संशय आल्याने त्याला तूझा मोबाईल कुठे आहे? असे विचारले असता त्याने कसारा घाटात फेकून दिल्याची माहिती दिली.नंतर त्याने सदर मोबाईल बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील एका लॉज मालकाला 5 हजार रुपयांमध्ये विकल्याची कबुली दिली. दरम्यान संबंधित लॉज मालकाशी संपर्क साधला तेव्हा मालकांनी मोबाईल व सिम कार्ड पोलिसांना देण्याची तयारी दाखवली आणि या मोबाईलच्या माध्यमातून विशालने ही हत्या करताना आणखी कोणाला संपर्क केला होता काय?याचा तपास आता सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यातील होंडा शाईन दुचाकी देखील ताब्यात घेतली आहे.