बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बारदान्या अभावी बुलढाण्यातील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र ठप्प झाले आहे.दरम्यान दोन दिवसात खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शिवसेनाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या वर्षभरापासून सोयाबीन हमीभावावरून नाराज शेतकऱ्यांना आता खरेदी केंद्रांवरही अडचणीचा सामना करावा लागतो आहे. बरदाना तुटवड्याने बुलढाण्यातील अनेक सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रच बंद असून शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र चालकांनाही ही खरेदी पूर्वपदावर कधी येणार याबाबत कल्पना नाही. सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र गेल्या 12 दिवसांपासून बंद असून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक खरेदी केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.त्यामुळे आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत दोन दिवसात खरेदी केंद्र सुरू करावे अन्यथा शिवसेना आंदोलन छेडणार असल्याचे उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी सांगितले आहे.