spot_img
spot_img

EXCLUSIVE! नायलॉन मांजाला ढिल नाहीच! – प्लास्टिक पिशवी विक्री, साठवणूकीवर दंडात्मक कारवाई! – आज नगरपालिकेने कुठे केली कारवाई?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बंदी असलेल्या मांजा विक्री व साठवणुकीबद्दल नगरपालिकेने 2 दुकानदारांवर आज कारवाई करत प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावला तर प्लास्टिक पिशवी संदर्भात देखील एका डेली निड्स येथे 5 हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.परंतु कागदी चहाचे कप, प्लास्टिक पिशव्या व संक्रांतिदरम्यान उडणाऱ्या पतंगां साठी लागणारा बंदी असलेला मांजा जप्तीच्या कारवाईची अंमलबजावणी नियमित राहील का?हा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

पक्षी, प्राण्यांसह मनुष्याच्या जीवाला धोकादायक ठरणाऱ्या चिनी, प्लास्टिक आणि नायलॉन माजांच्या विक्रीला राज्य सरकारने बंदी घातली आहे. मात्र तरीही अशा जीवघेण्या मांजाची छुपी विक्री, वापर आणि साठवणूक केली जात असल्याने यंत्रणा सतर्क झालीआहे.
मकरसंक्रांती जवळ येत असून पतंग उडविण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. यामुळे बाजारात बंदी असलेला मांजा विक्रीसाठी आणला जात आहे. विक्री करणाऱ्यांवर अनेकदा कारवाया झाल्यानंतर देखील अगदी सर्रासपणे मांजा विक्री केला जात आहे.आज मात्र नगरपालिकेने कारवाई केली.प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर, विक्री व साठवणुकीवर सुद्धा बंदी आहे. चहाच्या कागदी कपावर बंदी असल्यावरही शहरात व जिल्ह्यात कागदी कपांचा वापर जोरदार सुरू आहे.दरम्यान यावरही कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा नगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!